आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Not Olympic Each Year Orgnised At One Location

दरवर्षी ऑम्पिंपिक स्पर्धा एकाच ठिकाणी का होऊ नयेत ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने 2020 च्या उन्हाळी ऑलिंपिकच्या यजमान शहराची घोषणा केली आहे. टोकियोने इस्तंबूल आणि माद्रिदला मागे सारत यजमान बनण्याची संधी पटकावली आहे. यामुळे टोकियोतील विकसनशील पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीत वाढ होईल.

पण प्रत्यक्ष शहरातील परिस्थिती वेगळी आहे. या स्पर्धांच्या आयोजन स्थळावरून निर्वासित होणार्‍या नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. माँट्रियलला एक अब्ज डॉलरच्या ऑलिंपिक खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी 30 वर्षे लागले. 2004 मध्ये खर्च वाढल्यामुळे ग्रीसची अर्थव्यवस्था ढासळली होती. 2014 च्या वर्ल्डकप आणि रियो डी जानेरियो मध्ये होणार्‍या उन्हाळी ऑलिंपिकसाठी तेथील 1.5 लाख लोकांना स्थलांतर करावे लागणार आहे. यातील बहुतांश लोक झोपडपट्टय़ांमध्ये राहणारे मजूर लोक आहेत. रशियातील सोची येथे होणारे 2014 मधील हिवाळी ऑलिंपिक हे इतिहासातील सर्वात महागडे ऑलिंपिक असेल.

मॅरीलँड विद्यापीठातील सार्वजनिक धोरण विषयाचे प्राध्यापक जॉन रॅनी यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे. ऑलिंपिक आयोजनासाठी दरवर्षी नवी जागा निवडण्याऐवजी एक ऑलिंपिक बेट तयार करावे, असे मत त्यांनी मांडले आहे. तेथेच दरवर्षी स्पर्धा आयोजित केल्या जातील. ऑलिंपिक आयोजनासाठी तसेच प्रशिक्षणासाठी कायमची जागा मिळवण्यासाठी आयओसी एखादे बेट सहज खरेदी करू शकते. याची कार्यपद्धत इंटरनॅशन सिटी-स्टेटप्रमाणे असेल आणि संयुक्त राष्ट्र संघ त्यावर निगराणी ठेवेल. ऑलिंपिक स्पर्धांच्या आयोजनामुळे गरिबांचेच जास्त नुकसान होते, कारण त्यांना मूळ जागेवरून स्थलांतरित व्हावे लागते. बीजिंग ऑलिंपिकसाठी तेथील 5 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. प्रसारण आणि ब्रँडिंगच्या हक्कांमार्फत आयओसीला अब्जावधींचा महसूल मिळतो. पण शहर आयोजकांना फार कमी रक्कम मिळते. एका अहवालानुसार, 2010 मध्ये व्हँकुअरमध्ये हिवाळी ऑलिंपिक आणि लंडनमधील 2012 च्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी आयओसीच्या आयोजन समितीने 5.56 अब्ज डॉलरची मदत केली होती. या स्पर्धा घेण्यासाठी सुमारे 20 ते 30 अब्ज डॉलरपर्यंत खर्च आला होता. B theatlanticcities.com