आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wikipedia चे PVs तब्बल 200 कोटींनी घटले, एका वर्षांत झाली 10 टक्के घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Wikipedia या ऑनलाइन मुक्‍त ज्ञानकोशाचे PVs (पेज व्ह्युज) गेल्या एका वर्षांत तब्बल 10 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 200 कोटींनी घटले असल्याचे वृत्त आहे. Wikipedia च्या इंग्रजी, जर्मनी आणि जापानी या सर्वांधिक वाचल्या जाणाऱ्या आवृत्त्यांचे PVs कमी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डिसेंबर 2012 ते डिसेंबर 2013 या एका वर्षांत Wikipedia चे PVs तब्बल 200 कोटींनी घटल्याचे समजते. इंग्रजी, जर्मनी आणि जापानी या Wikipedia च्या सर्वांधिक चालणाऱ्या आवृत्त्या गणल्या जातात. परंतु, याच आवृत्त्यांना खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी आवृत्तीचे PVs 12 टक्क्यांनी, जर्मनी आवृत्तीचे PVs 17 टक्क्यांनी तर जापानी आवृत्तीचे PVs चक्क 9 टक्क्यांनी घटले आहेत.
PVs मोजण्याच्या पद्धतीत चुक झाल्याने PVs कमी झाले आहेत, असे Wikipedia च्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे. परंतु, Google च्या नॉलेज ग्राफ्स प्रोजेक्टमुळे Wikipedia चे PVs कमी झाले आहेत, असे ऑनलाइन विश्लेषक सांगतात.
Wikipedia च्या भारतीय भाषा आवृत्त्यांच्या गतीलाही खिळ बसल्याचे दिसून येत आहे. हिंदी आवृत्तीचे PVs 34 टक्क्यांनी, बंगाली आवृत्तीचे PVs 46 टक्क्यांनी तर मल्ल्याळम आवृत्तीचे PVs 36 टक्क्यांनी वाढले आहेत. परंतु, मराठी आवृत्तीचे PVs 4 टक्क्याने तर तेलगू आवृत्तीचे PVs केवळ 1 टक्क्याने वाढले आहेत. तमिळ आवृत्तीत तर घट नोंदविण्यात आली आहे. तमिळ आवृत्तीच्या PVs मध्ये तब्बल 11 टक्क्यांनी घट झाली आहे.
comScore च्या माहितीनुसार Wikipedia जगातील सहाव्या क्रमांकाची वेबसाईट असून गेल्या वर्षी युनिक व्हिजिटर्स सुमारे 52 कोटी 30 लाख होते.