आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायरसी कायद्याविरोधात विकीपीडियाचे बुधवारी ब्लॅकआऊट!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अमेरिकेत अँटी पायरसी कायद्यावरून सध्‍या गदारोळ सुरू आहे. या कायद्याला विरोध दर्शवत विकीपीडिया बुधवारी 18 जानेवारीला 24 तासांसाठी त्‍यांची सेवा बंद ठेवणार आहे, अशी माहिती विकीपीडियाचे सह-संस्‍थापक जिमी वेल्‍स यांनी सोमवारी ट्विटरवरून दिली.
अमेरिकेतील शाळकरी मुलांना उद्देशून वेल्‍स म्‍हणाले की, 'विकीपीडिया बुधवारी आपली सेवा बंद ठेवणार असल्‍याने मुलांनी त्‍यांचा गृहपाठ पूर्ण करावा.'
अमेरिकन संसदेने मांडलेल्‍या 'स्‍टॉप ऑनलाईन पायरसी अ‍ॅक्‍ट(सोपा) आणि प्रोटेक्‍ट आयपी अ‍ॅक्‍ट(पीपा) या दोन्‍ही कायद्यांना वेल्‍स यांचा विरोध आहे. मागील काही महिन्‍यांपासून अमेरिकेत सोपावरून वाद सुरू आहेत. मोशन पिक्‍चर्स असोसिएशन ऑफ अमेरिका या संस्‍थेने या कायद्याचे समर्थन केले आहे. दुसरीकडे, गूगल आणि फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटने हा कायदा म्‍हणजे अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यावर गदा असल्‍याचे म्‍हटले आहे. विकीपीडिया या साईटला जवळपास अडीच कोटी लोक दररोज भेट देतात.
सोशल मिडीयाप्रश्नी सिब्बलांनी केली सारवासारव; गूगल-ट्विटरने दिले प्रत्त्युत्तर