आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकिपीडियाची इंग्रजी वेबसाइट आज बंद, कंपनीने दिला संदेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगभरातील ज्ञानाचे भांडार असणारे व कोणत्याही प्रश्नांची सहजतेने उकल करणारी वेबसाइट 'विकिपीडिया' आज दिवसभर बंद आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहासमोर पायरसी प्रतिबंधक विधेयक मांडण्यात आले आहे तसेच त्यावर चर्चा सुरू असल्याने त्याचा निषेध म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीचे सहसंस्थापक जिमी वेल्स यांनी काल माहिती दिली होती.
समस्त नेटीझन्ससाठी आजचा दिवस निराशाजनक असणार आहे. त्यामुळे कंपनीने आज आपल्या मुखपृष्ठावर 'imagine a world without free knowledge' हे घोषवाक्य टाकले आहे.
हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असून ते रचनात्मक नाही, असा आरोप करीत विकीपेडियाने याचा निषेध म्हणून बुधवारी चोवीस तास वेबसाइटचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे विधेयक मंजूर झाले तर स्वातंत्र्यावर गदा येणार आहे, अशी भीती सोशल नेटवर्किंग साइट्सला वाटू लागली आहे. हा निर्णय हुकूमशाहीचा आहे, असे सांगत विकीपेडियाने आपले इंग्रजी व्हर्जन चोवीस तासांसाठी बंद ठेवले आहे. मात्र प्रादेशिक भाषांतील माहिती येत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहासमोर (सिनेट) स्टॉप ऑनलाइन पायरसी ऍक्ट (एसओपीआय-सोपा) आणि प्रोटेक्ट आयपी ऍक्ट (पीआयपीए-पीपा) या दोन कलमावर चर्चा सुरु आहे.
पायरसी कायद्याविरोधात विकीपीडियाचे बुधवारी ब्लॅकआऊट!