आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमध्ये वन्य प्राणी तस्करांचा पर्दाफाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - बेकायदेशीररीत्या घरात वन्य प्राणी ठेवल्याच्या एका तक्रारीवरून सोमवारी पोलिसांनी एका घरावर छापा मारला. पोलिसांना येथे 14 आफ्रिकी सिंहांसह जवळपास 1000 प्राणी पिंज-यात डांबून ठेवलेले आढळले. आजूबाजूचे लोक प्राण्यांच्या आवाजाने प्रामुख्याने सिंहांच्या डरकाळ्यांनी हैराण झाले होते. त्या नंतर पोलिसांनी संशयिताचा मागोवा घेतला व ही कारवाई केली. पिंज-यांना सील ठोकून पोलिसांनी प्राणी जप्त केले व स्थानिक प्राणी संग्रहालयात रवाना केले.


पेट शॉपचा मालक गजाआड : प्राण्यांचा तस्कर मांत्री बूनफोनून (41) याला वन्यजीव कायदा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मांत्री याचा पाळीव प्राणी विक्रीचा व्यवसाय आहे. थायलंडच्या कायद्यानुसार आरोपीस 4 वर्षे तुरुंगवास व 1300 डॉलर (५ 75,500) दंडाची शिक्षा होऊ शकते.
थायलंड हे वन्यप्राणी तस्करांचे मोठे केंद्र आहे. दरवर्षी पोलिस येथे छापा मारून मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांची सुटका करतात.
प्राणी जप्त
23मीरकॅट
17माकडे
12 मोर
01हजार शुगर ग्लायडर्स