Home | International | Other Country | wills-kate wedding kiss named uk's 'top television moment of 2011

‘रॉयल किस’ ठरला ब्रिटनचा फेव्हरिट

वृत्तसंस्था | Update - Dec 31, 2011, 12:33 AM IST

ब्रिटन राजघराण्याचे ड्यूक विल्यम व डचेस ऑफ केंम्ब्रिज केट मिडलटन यांच्या विवाहानंतरचा बकिंगहॅमच्या गॅलरीतील रॉयल किस हा ब्रिटनच्या नागरिकांचा सर्वात आवडता क्षण ठरला आहे.

  • wills-kate wedding kiss named uk's 'top television moment of 2011

    लंडन - ब्रिटन राजघराण्याचे ड्यूक विल्यम व डचेस ऑफ केंम्ब्रिज केट मिडलटन यांच्या विवाहानंतरचा बकिंगहॅमच्या गॅलरीतील रॉयल किस हा ब्रिटनच्या नागरिकांचा सर्वात आवडता क्षण ठरला आहे. 2011 मधील टीव्हीवरील फेव्हरिट लाइव्ह मोमेंटमध्ये या क्षणाची नोंद करण्यात आली आहे.
    2011 मध्ये या शाही विवाह ब्रिटनमधील सर्वात हॉट विषय ठरला. त्यानंतर या दोघांच्या रॉयल किसची चर्चा मीडियासह सामान्य नागरिकांतून खूप रंगली. वर्षभरातील सर्वात रोमँटिक लाइव्ह मोमेन्ट म्हणून ब्रिटनच्या नागरिकांनी या क्षणास आपली पसंती दिली. हा शाही विवाह आणखी एका कारणासाठी चर्चेत राहिला होता. केटची बहीण पिपा हिनेदेखील सर्वाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते, असे डेली एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. या काळात तिची प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमुळे ती वादात सापडली. त्यामुळे ती लवकरच जगातील एक फॅशन आयकॉन बनली, असे मत ब्रिटनच्या नागरिकांनी व्यक्त केल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. डिजिटल टीव्ही सर्व्हिस फ्रीव्ह्यूच्या वतीने ही पाहणी करण्यात आली. ब्रिटनमध्ये तसे तर राजघराणे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच साजरा झालेला ख्रिसमसदेखील चर्चेचा विषय ठरला. यंदा राजांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ख्रिसमसचा आनंद नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करता आला नाही, याची बातमी ब्रिटनमधील वर्तमानपत्रांची मथळा ठरली नसती तरच नवल. राजघराण्याव्यतिरिक्त झुरळ चढाई करताना दाखवण्यात आलेला टीव्ही लाइव्ह मोमेन्ट ब्रिटनच्या नागरिकांना आवडला. त्याला वर्षातील दुसरा सर्वात आवडता क्षण म्हणून पसंती देण्यात आली आहे.
    भाला फेकणा-या फातिमा व्हाइटब्रेडच्या कामगिरीवर आधारित कार्यक्रम पाहणीत तिस-या स्थानी आहे. ज्योतिषी रसेल चौथ्या तर जेडवर्डचा सहभाग असलेला बिग ब्रदरमधील काही क्षण हे पाचव्या स्थानी राहिले.

Trending