आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wimbledon Tournament Target By Al Qaeda Terrorist, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बलडन स्पर्धा अल कायदाच्या निशाण्यावर; ब्रिटनने वाढवली सुरक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमध्ये आजपासून (सोमवार) सुरु होणार्‍या 'विम्बलडन' टेनिस स्पर्धेत दहशतवादी संघटना अल कायदा मोठा घातपात घडवण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र 'डेली एक्सप्रेस'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. देशात दहशतवादी कारवाया घडवून आणणार्‍यांना अल कायदाने हातशी घेतले असून ते 'विम्बलडन'ला टार्गेट करू शकतात, असे म्हटले आहे.
'डे‍ली एक्स्प्रेस'मधील वृत्तानुसार, विम्बलडन स्पर्धेत दहशतवादी बॉम्ब स्फोट घडवू शकतात, अशी भीती ब्रिटन प्रशासनाला वाटत आहे. अल कायदाने सीरिया आणि इराकमध्ये सुरु असलेल्या बंडखोरांच्या हिंसाचाराला पाठिंबा दिल्याचे समजते. तसेच इराक आणि ‍सीरियामध्ये सुरु असलेला संघर्ष ब्रिटनपर्यंत पोहोचवण्यासाठी अल कायदा प्रयत्न करत असल्याचाही संशय ब्रिटनच्या पोलिसांना आहे.
विम्बलडनच्या उद्‍घाटन सोहळ्याला सिने इंडस्ट्री, राजकीय तसेच शाही कुटूंबातील सदस्य उपस्थित राहणार आहे. दोन आठवडे चालणार्‍या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील लाखों प्रेक्षक येथे उपस्थित होतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आल्याचे सूत्रांन‍ी सांगितले आहे.