ला राइयजा(स्पेन) - प्रत्येक वर्षाच्या 29 जूनला स्पेनमधील ला राइयजा प्रांतातील हारो शहरात वाइन फाइट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात स्थानिक रहिवाशी आणि पर्यटक सहभागी होतात आणि ते एकमेंकांवर वाइन फेकतात. या महोत्सवात वाइन पिण्याची आणि बादल्या भरून एकमेकांच्या अंगावर वाइन उधळण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.
लाल शर्ट्स, रेड वाइन
रेड वाइनच्या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी लाल रंगाचा शर्ट आणि पांढ-या रंगाची पँटच घालण्याची सक्ती आहे. महोत्सवाआधी हारो शहरातून मिरवणूक काढण्यात येते. हातात रेड वाइनने भरलेले मग, बादल्या, कंटेनर घेऊन लोक सहभागी होतात.
डोंगराच्या वादाचे कारण...
हारो आणि मिरांडा डे इब्रो या दोन गावांमध्ये सीमेवरील डोंगरावरून 10 व्या शतकापासून वाद होता. तो वाद मिटल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ हा महोत्सव आयोजित केला जातो.
* 1,30,000 लिटर रेड वाइन भिरकावली एकमेकांच्या अंगावर
* 9000 पर्यटक आणि स्थानिकांचा वाइन महोत्सवात सहभाग
* 1906 पासून दरवर्षी आयोजित केला जातो हारो वाइन महोत्सव
पुढील स्लाइड्सवर पाहा महोत्सवाची छायाचित्रे.....