आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Winners Of World Press Photos In Eight Categorizes

World Press Photo: आठ कॅटेगरींमध्ये या टॉप फोटोंनी जिंकला पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- नेचर कॅटेगरी (सिंगल), पहिला पुरस्कार, फोटोग्राफर: योंगझी चू, चीन)
अॅम्सटरडॅम (नेदरलॅंड)- यावर्षीच्या वर्ल्ड प्रेस फोटो कॉन्टेस्टमधील विजेत्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ दी इअरचा किताब फोटोग्राफर मॅड्स निसेनने पटकावला आहे. रशियातील समलिंगी दांपत्याचे अंतरंग या फोटोत टिपण्यात आले आहे. समलिंगी जॉन आणि अॅलेक्स यांच्या जोडिवर निसेनने 'होमोफोबिया इन रशिया' हा फोटो प्रोजेक्ट केला होता. रशियात समलिंगी लोकांसाठी परिस्थिती किती खडतर आहे, हे या फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. निसेनला तब्बल 11,330 डॉलर (सुमारे 7 लाख रुपये) पुरस्कारादाखल मिळाले आहे.
याशिवाय या स्पर्धेत एकूण आठ कॅटेगरींमध्ये स्पर्धा घेण्यात आली. यातील नेचर कॅटेगरीत भारतीय फोटोग्राफर आनंद वर्मा यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी तब्बल 76 तास जंगलात व्यतित करीत मुंगीच्या मृत्यूचे फोटो घेतले होते. जगातिल अनेक भागांमध्ये पसरलेल्या हिंसाचाराचे फोटोही या स्पर्धेत सामिल करण्यात आले होते. या स्पर्धेतील प्रत्येक कॅटेगरीत पुरस्कार पटकावणाऱ्या स्पर्धेकाला 1,500 यूरो (सुमारे एक लाख रुपये) देण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, या स्पर्धेत पुरस्कार पटकावणारे फोटो... त्यांची माहिती...