आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Winston Churchill 's Family Feared He Might Convert To Islam

विन्स्टन चर्चिल तेव्हा इस्लाम स्वीकारणार होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - केम्ब्रिज विद्यापीठात सापडलेल्या १९०७ मधील एका पत्रानुसार ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांना इस्लाम धर्माबद्दल अत्यंत अाकर्षण होते. कदाचित तेव्हा त्यांना इस्लाम धर्मही स्विकारावयाचा होता. विद्यापीठातील एका इतिहास संशोधकाने हा दावा केला आहे.
‘संडे टेलिग्राफ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, इतिहास संशोधक वॉरेन डोक्टर यांना चर्चिल यांच्या भावजयीने त्यांना लिहिलेले एक पत्र सापडले आहे. यात इस्लाम धर्म चर्चिल यांनी कोणत्याही परिस्थितीत स्विकारू नये, असा आग्रह करण्यात आला होता. चर्चिल यांचे बंधू जॅक यांच्या पत्नी लेडी ग्वेनडॉलिन यांचे हे पत्र आहे. विवाहापूर्वी यांनी हे पत्र लिहिले होते. यात त्यांनी चर्चिल यांना उद्देशून म्हटले आहे की, ‘इस्लाम धर्म तुम्हाला मनापासून आवडतो हे मला चांगले माहीत आहे. मात्र, ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम स्विकारू नये, असे मला वाटते.’ इस्लाम स्विकारणे जेवढे सोपे तेवढेच मुस्लिम होऊन जगणे कठीण असल्याचे ग्वेनडॉलिन यांनी पत्रात म्हटले होते. १९०७ मध्येच चर्चिल यांनी आपल्या भावजयीला लिहिलेल्या एका पत्राचा संदर्भ संडे टेलिग्राफने दिला आहे. त्यात चर्चिल यांनी लिहिले आहे की, मला पाशा बनून जगणे आवडेल. यावर ग्वेनडॉलिन यांनी चर्चिल यांनी इस्लाम स्विकारू नये, असा सल्ला दिला असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
लंडनमध्ये मशिदीला परवानगी
चर्चिल यांनी १९४० मध्ये लंडनमध्ये एका मशिदीच्या बांधकामास परवानगी दिली होती. यासाठी त्या काळात लाख पौंड निधीही त्यांनी जाहीर केला होता. ही मशिद लंडन सेंट्रल मॉस्क म्हणून ओळखली जाते.
चर्चिल यांचे पूर्वायुष्य कारणीभूत
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी चर्चिल लष्करात होते. युद्धकाळात सुदान आणि भारतात त्यांची नेमणूक होती. या काळामध्ये त्यांचा मुस्लिमांशी संपर्क आला. तेव्हापासून चर्चिल या धर्माबद्दल प्रभावित झाले होते, असा दाखला संडे टेलिग्राफने दिला आहे.