आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या विस्कॉसीनमधील गुरुद्वारामध्ये रविवारी रात्री 10.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) अंदाधुंद गोळीबार करणा-या श्वेतवर्णीय नागरिकाच्या हल्ल्यात आठ जण ठार झाले. अमेरिकी गुप्तचर संस्था एफबीआयने या घटनेची तत्काळ चौकशी सुरू केली आहे.
हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचे नाव वेज मिशेल पेज असल्याचे सांगण्यात येते. पेज हा अमेरिकी सेनेत मनोवैज्ञानिक ऑपरेशन विशेषज्ञ होता. ज्याला 1998 मध्ये 6 वर्षांच्या नोकरीनानातर बडतर्फ करण्यात आले होते. 40 वर्षीय पेजला त्याच्या खराब वागणुकीमुळे अमेरिकेच्या सेनेतून बडतर्फ करण्यात आले होते.
हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी खेद व्यक्त करून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अमेरिकी प्रशासनाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
अमेरिकेत तीन आठवड्यांच्या आत दुसरे हत्याकांड घडल्याने प्रशासन हादरले आहे. मिलवाकी शहराच्या ओक क्रिक उपनगरातील 15 वर्षे जुन्या गुरुद्वारामध्ये ही घटना घडली. 40 वर्षांच्या समाजकंटकाने गोळीबार केला होता. अमेरिकेत जवळपास 7 लाख शीख समुदाय आहे.
हल्लेखोराला ठार करणा-या पोलिस अधिका-याच्या मते, त्याच्या अंगावर 9/11 चा टॅटू होता. हल्लेखोराचा उद्देश स्पष्ट होऊ शकला नाही. देशांतर्गत दहशतवादाची शक्यता पडताळली जात आहे, असे एफबीआयचे अधिकारी तेरेसा कार्लसन यांनी सांगितले.
अमेरिकेतील गुरुद्वारात बेछूट गोळीबार; आठ ठार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.