आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या पंधरा सेकंदांत लादेनचा खात्मा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वॉशिंग्टन - कुख्यात दहशतवादी ओसाबा बिन लादेनला केवळ 15 सेकंदांमध्ये ठार मारण्यात आले होते. शेवटच्या क्षणी त्याने त्याच्या तिस-या बायकोचा ढालीसारखा वापर केला होता. लादेनला ठार करणा-या अमेरिकी सील कमांडो पथकाच्या सदस्याने मंगळवारी हे रहस्योद्घाटन केले. या सदस्याने अस्क्वायर या नियतिकालिकाला मुलाखत दिली मात्र आपले नाव गोपनीय ठेवण्यास सांगितले. त्याने लादेनला ठार मारण्याच्या संपूर्ण मोहिमेचीच माहिती दिली. अखेरच्या निर्णायक क्षणी लादेनची ओळख पटवण्यापासून ते त्याला ठार मारण्याची प्रक्रिया केवळ 15 सेकंदात पूर्ण करण्यात आली, असे तो म्हणाला.