आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक संबंध प्रस्थापित न करताच संततीप्राप्ती शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लैंगिक संबंधाशिवाय मानवांना संततीप्राप्तीचे सुख घेता येण्याची शक्यता बळावली आहे. सुक्ष्म जीवांमध्ये पुनरुत्पादनाचा यशस्वी प्रयोग करणा-या भारतीयवंशाच्या अनुवंशशास्त्रज्ञाने भविष्यात लैंगिक संबंध प्रस्थापित न करताच मानवी प्रजनन शक्य असल्याचा दावा केला आहे.
लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या प्राध्यापक आरती प्रसाद यांनी दोन भिन्न लिंगामध्ये लैंगिक संबंधाशिवया आणि कोणत्याही वीर्यदात्याखेरीज मानवी गर्भधारणा होण्याचे दिवस आता फार
लांब राहिले नसल्याचा दावा केला आहे. केवळ दशकभरापूर्वीच टेस्टट्यूब बेबीचा प्रकार सायन्स फिक्शन समजला जायचा मात्र आता तो वस्तुस्थिती म्हणून स्वीकारण्यात आला आहे. आपण सारे मानवी जीव आपल्याच नियतीच्या नियतीच्या चक्रात बांधले गेलो आहोत मात्र मानवी जीवनाबाबत पवित्र किंवा विशेष असे काहीही नाही. जेथे विज्ञान म्हणजेच आपण सर्वकाही बाबी आपणाला हव्या तशा करून घेऊ शकतो. अगदी प्रजननाची प्रक्रियाही आपणाला हवी तशी घडवू शकतो, ही मूलभूत संकल्पना प्रसाद यांनी त्यांच्या ‘लाइक अ व्हर्जिन’ या पुस्तकात मांडली आहे. लैंगिक संबंधाशिवाय गर्भधारणा विज्ञानाच्या टप्प्यात आहे, हा आरती प्रसाद यांच्या कथेचा मूलाधार आहे.
आरतीच्या या पुस्तकामध्ये अनेक गमतीदार किस्से सांगण्यात आले आहेत. व्हर्जिन बर्थ अशक्य नाही, या तिच्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ हे किस्से सांगण्यात आले आहेत. मात्र असे करण्याचे धोकेही या पुस्तकात सांगण्यात आले आहेत. असे प्रकार जर वाढीस लागले तर नैसर्गिकरित्या मानवी प्रजननाची प्रक्रियाच धोक्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
कृत्रिम वीर्य, उदर मग प्रजनन का नाही?
ऑस्ट्रेलियामध्ये नैसर्गिक उदरातील तरल पदार्थ आणि जीवाणूच्या सहाय्याने गर्भाची वाढ करणारे प्लास्टिक कंटेनरच्या आकाराचे कृत्रिम उदर यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. आरतीच्या मते कोणत्याही महिला जोडीदाराच्या सहकार्याशिवाय अशा उदरांमध्ये माणसांना तांत्रिकदृष्ट्या गर्भाची वाढ करणे एक दिवस सहज शक्य होणार आहे. विज्ञानाने कृत्रिम वीर्यही विकसित केलेले आहे. त्याचा वापर करून कृत्रिम गर्भधारणाही करण्यात आली असल्यामुळे अशा प्रकारे प्रजनन करण्याचा दिवस लांब राहिलेला नाही, असा आरतीचा दावा आहे.
पुरुष आई का होऊ शकत नाही?- एखादा पुरुष आई का होऊ शकत नाही? ‘आई’पणाचा एवढा बाऊ कशासाठी करायचा आणि ती जबाबदारी फक्त महिलांनीच का वाहायची? आईपणाबद्दलचे मानवी पूर्वग्रह बदलण्याची आता वेळ आली आहे.- आरती प्रसाद, इम्पिरियल कॉलेज, लंडन