आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wolf Makes Manmohan Singh To Miss Dinner Party In Germany

जर्मनीत पंतप्रधानांच्या डिनरला अचानक कोल्ह्याची एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- द्विपक्षीय चर्चेसाठी जर्मनी दौर्‍यावर असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डिनर टाळावे लागले. चान्सलर अँजेला मार्केल यांनी हे रात्रीभोजन आयोजित केले होते. परंतु डिनरच्या काही वेळ अगोदर कोल्ह्याने चान्सलरीमध्ये प्रवेश केला आणि काही क्षणांसाठी थरार उडवून दिला.

चान्सलरच्या कार्यालय परिसरात कोल्होबाने अचानक एंट्री मारल्याने सुरक्षा रक्षक चकित झाले. तो कोठून आला हेच त्यांना कळायला मार्ग नव्हता. हा कोल्हा कार्यालयाच्या परिसरात भटकला आणि काही मिनिटांत स्वत:हून निघूनही गेला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोल्हा निघून गेल्यानंतर नियोजित डिनरला मात्र सिंग यांनी हजेरी लावली नाही. परंतु वाणिज्यमंत्री आनंद शर्मा, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पौलोक चॅटर्जी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, पंतप्रधानांचे खासगी सचिव विक्रम मिस्री यांनी या भोजनाचा आनंद घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. काही क्षणासाठी आलेल्या कोल्होबामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात पंतप्रधानांचे डिनर मात्र हुकले.

सहा नवीन करार
भारत-जर्मनी यांच्यात महत्त्वाच्या सहा क्षेत्रांत सामंजस्य करारांवर गुरुवारी स्वाक्षरी करण्यात आली. उच्च् शिक्षणातील संशोधन क्षेत्रावर दोन्ही देश एकत्रित काम करणार आहेत. ग्रीन एनर्जी कॉरिडोरसाठी एक अब्ज युरोची गुंतवणूक करण्यात येणार आहे. जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या एका कराराचाही त्यात समावेश आहे. जर्मनी हा भारताचा युरोपमधील महत्वाचे मित्र राष्ट्र आहे. विविध क्षेत्रांत उभय देश सहकार्य वाढवतील. विमा क्षेत्र खुले करण्याचा मनोदय पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केला.