आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आणि पुरुषांवर मद्याचा कैफ वेगवेगळा; बाटली एक, पण..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - दारूची नशा सर्वांसाठी सारखी, असा तुमचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे. कारण मद्याचा कैफ पुरुष आणि महिलांवर वेगवेगळ्या अमल करतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

पुरुष रागाच्या भरात दारू पितात. तेव्हा दुसर्‍या दिवशी पुनरावृत्ती करण्याची शक्यता असते. काही वेळा मद्यपान केल्यानंतर अनेकांना आनंद, दु:खासारख्या कोणत्याच भावना मनात येत नाहीत, व्हेरमाँट विद्यापीठाने केलेल्या पाहणीत काही जणांनी मद्यपानामागे मूड सुधारणे, असे कारण सांगितले. दारू प्यायल्यानंतर व्यक्तीमधील राग कमी होत असेल किंवा त्याचे दु: ख हलके होत असेल, हा अंदाज खोटा ठरला. पाहणीतील नवीनच माहिती मिळाली. झिंग चढल्यानंतर लोक आनंदी तर नव्हतेच, उलट त्यांना आणखी मद्याची तलफ होत असल्याचे दिसून आले.