आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलींसह भारतीय महिलेचा मृतदेह आढळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारतीय वंशाची महिला दोन मुलींसह संशयास्पद अवस्थेत मृत आढळल्याने वायव्य लंडन भागात खळबळ उडाली आहे. हिना सोलंकी (34) असे महिलेचे नाव आहे. रूस्लीप येथील त्यांच्या घरात प्रीश (4) आणि जास्मीन (9) या मुलींचाही मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पोलिसांनी ही माहिती मिळाली, असे स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने सांगितले. ही घटना रासायनिक प्रकारातून घडली असावी, असा प्राथामिक अंदाज आहे. हिना लंडनमधील एका माध्यमिक शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नोकरी करत होत्या. त्यांच्या फेसबुक पेजवरील प्रोफाईलमध्ये त्यांचे शिक्षण दक्षिण गुजरात विद्यापीठात झाल्याची माहिती मिळते.