आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रेषित’ असल्याचा दावा करणार्‍या महिलेस पाकिस्तानात अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - ‘प्रेषित’ असल्याचा दावा करणार्‍या एका महिलेस पाकिस्तानात अटक करण्यात आली. या महिलेचे नाव सलमा फातिमा असून सोमवारी सकाळी तिने आपणच प्रेषित असल्याचा दावा करणारी पत्रके शहरात वाटली होती. तिच्याविरुद्ध वादग्रस्त ईशनिंदा कायद्याचे कलम लावण्यात आले आहे. लाहोर शहरातील गजबजलेल्या गुलबर्ग भागात राहणार्‍या फातिमाने सोमवारी सकाळी गावभर वितरित केलेल्या पत्रकांमध्ये आपण मुस्लिमांचे प्रेषित असल्याचा दावा के लाच, शिवाय प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूरही लिहिला होता.

हे पत्रक हातात पडल्यानंतर शेकडो संतप्त नागरिक फातिमाच्या घरावर चालून गेले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी फातिमाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्यामुळे तिचा जीव वाचला.

स्थानिक मौलवींच्या तक्रारीवरून फातिमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस तिची चौकशी करीत असून तिचा नवरा तन्वीर यालाही अटक करण्यात आली आहे, असे लाहोरच्या पोलिस अधीक्षकाने सांगितले.