आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Beheaded In Saudi Arabia For Murder Charges

Video: पवित्र मक्का शहरात महिलेचा खुलेआम शिरच्छेद; सावत्र मुलीचे शोषण करुन हत्येचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाद- सौदी अरबमधील पवित्र मक्का शहरात खुलेआम एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सोमवारी म्यानमार वंशाची लैला बिन अब्दुल मुत्तालिब बासिम हिचा भर रस्त्यावर पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शिरच्छेद करण्यात आला. लैला बिन हिच्यावर सात वर्षीय सावत्र मुलीचे शारीरिक शोषण करुन हत्या केल्याचा आरोप होता.

इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेला ओढत भर रस्त्यावर आणण्यात आले. सावत्र मुलीची हत्या केल्याने तिला दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, तिने हत्या केली नसल्याची सांगत ती सगळ्यांची विनवणी करत होती. मात्र, तिचे ऐकूण न घेता खुलेआम तिचे शिर कलम करण्यात आले.

'यू-ट्यूब'ने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. मात्र, नंतर काही मिनिटांत तो साइटवरून काढून टाकला. मात्र, अजूनही अन्य वेबसाइट्सवर हा व्हिडिओ दिसत आहे. न्यूज एजेन्सी 'मिडिल ईस्ट आय'ला हा व्हिडिओ मिळाला आहे.
मानवाधिकार कार्यकर्ता मोहम्मद अल-सईद यांनी सांगितले की, सौदी अरबमध्ये शिरच्छेद करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या प्रकारात दोषीला पेनकिलर देऊन त्याचे शिर कलम केले जाते. तर दुसर्‍या प्रकारात पेनकिलर दिले जात नाही. लैला बिन या महिलेचे पेनकिलर न देताच शिर कलम करण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, घटनेचा व्हिडिओ...