आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Bitten By Snake During Taking Selfie, News In Marathi

विषारी सापासोबत सेल्‍फी घेणे पडले महागात, सर्पदंशाने महिला गेली कोमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्‍को(रशिया) - विषारी सापासोबत सेल्‍फी घेणे रशियन महिला पर्यटकाला चांगलेच महागात पडले आहे. सर्पदंशामुळे ती कोमामध्‍ये गेली आहे. तर तिला सेल्‍फीची ऑफर देणा-या स्‍थानिक युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या म‍ाहितीनुसार, रशियाचा 34 वर्षीय ओलिवर मट्वेयेव हा तरुण पर्यटकांना विषारी सापासोबत सेल्‍फी फोटो घेण्‍यास प्रेरीत करत होता. कुबान नदी तिरावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत फिरायला येत असताना तेथे तो हा खेळ करत होता. त्‍याच्‍या आमिषाला एक महिला पर्यटक बळी पडली आणि तिला सर्पदंशामुळे कोमात जावे लागले. ही महिला पर्यटक हॉस्‍पीटलमध्‍ये भरती करण्‍यात आली आहे.
परवानाही नव्हता
अटक केलेल्‍या तरुणाकडे प्रतिविष (अँटी डोट्स) नव्‍हते. तसेच विषारी सापाला पकडण्‍याचा कोणताही परवाना नव्‍हता. पोलिसांनी सांगितले की, महिला सध्‍या कोमात असून ती बयान देऊ शकत नाही. पुढील तपास पोलिस करत आहेत.

(फोटो - सर्पदंशाची बळी ठरलेल्‍या महिलेचे नाव अद्याप सार्वजनिक केले नाही.)
पुढील स्‍लाइडवर पाहा पीडीत महिलेचे छायाचित्र..