आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Dies Of Heart Attack After Meeting Brother In Pakistan

तब्बल 16 वर्षांनंतर भावाला पाहाताच बहिणीने सोडला प्राण; पाकिस्तानातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- तब्बल 16 वर्षांनंतर आपल्या भावाला पाहाताच एका भारतीय महिलेने प्राण सोडल्याची घटना लाहोर रेल्वे स्थानकावर घडली आहे. सरला जेवटराम बदलानी असे या महिलेची नाव असून त्या महराष्ट्रातील उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. सरला बदलानी त्यांच्या भावाला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानात आल्या होत्या. मात्र, आपल्या भावाला पाहातच सरला बदलानी अत्यंत भावून झाल्या होत्या. त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा ‍तीव्र झटका आला आणि त्यांचा क्षणात मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सरला बदलानी यांचा भाऊ पाकिस्तानातील लरकाना येथील रहिवासी आहे. महेशकुमार असे त्यांचे नाव आहे. आपल्या भावाला भेटण्यासाठी सरला बदलानी यांनी अनेकदा पाकिस्तानात येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चार वेळा त्याचा व्हिसा रद्द झाला होता. पाचव्या प्रयत्नात व्हिसा मंजूर झाल्याने त्या खूप आनंदी होत्या. तब्बल 16 वर्षांनंतर भावाला पाहाण्यासाठी उत्साहीत झाल्या होत्या. मात्र, लाहोर रेल्वे स्टेशनवर पोहोचताच सरला बदलानी यांनी आपल्या भावाला डोळे भरून पाहिले. परंतु तितक्यात त्यांना ह्रदयविकाराचा तिव झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
आपली बहिण सरला बदलानी यांचे पार्थिव भारतात नेण्यासाठी तत्काळ व्हिसा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी महेश कुमार यांनी पाक सरकारकडे केली आहे.
महेश कुमार यांची बहिण सरला बदलानी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी भारतात नेण्यासाठी तत्काळ व्हिसा मंजूर करण्‍यात येणार असल्याचे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे.