आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने टॉयलेटमध्ये फेकले 3.45 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अतिमद्यपान करून लॉटरीत मिळालेली सुमारे 3 कोटी 45 लाख रुपयांची रक्कम फाडून शौचालयात फेकून दिल्याची विचित्र घटना जर्मनीत उजेडात आली.

अँगेला मेइर असे जर्मन महिलेचे नाव आहे. मूळच्या एस्सान येथील अँगेला यांना राष्ट्रीय लॉटरी लागली होती, परंतु पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडून आलेल्या संदेशाने त्यांची झोप उडाली होती. पतीवरील वैद्यकीय उपचाराचा खर्च प्रचंड झाल्याने अँगेला संतापलेल्या होत्या. लॉटरी लागल्याचा आनंदही त्यांना फारसा झाला नाही. त्याच मन:स्थितीत त्यांनी एवढ्या मोठ्या रकमेचे तुकडे केले आणि ते शौचालयात टाकून दिले. वैद्यकीय देयके देण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचेही सांगितले जाते.