आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Got Punishment Due To Drive By Google Glass

गुगल ग्लास घालून ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी महिलेला दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- अमेरिकेत गुगल ग्लास वापरून वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी महिलेला दंड ठोठावला आहे. तिच्यावर अतिवेगाने गाडी चालवण्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईच्या विरोधात महिलेने न्यायालयात धाव घेतली आहे. गुगल ग्लास लावून गाडी चालवण्याचे कोर्टात पोहोचलेले हे पहिलेच प्रकरण आहे.
कॅलिफोर्नियातील सेसेलिया अबादेई या 44 वर्षीय महिलेने पोलिस कारवाईला न्यायालयात आव्हान दिले आहे. तिच्या म्हणण्यानुसार गाडी चालवतेवेळी गुगल ग्लास डोळ्यावर असला तरी त्याचे स्वीच बंद होते. सामान्य चष्म्याप्रमाणेच मी त्याचा वापर करत होते. त्यासाठी आपल्याला दंड करणे चूक आहे, असा तिचा युक्तिवाद आहे. अबादेईच्या वकिलांनी सांगितले की, दंडाचा चालान फाडणा-या अधिका-याला चालक गुगल ग्लास लावून वाहन चालवत होता हे सिद्ध करावे लागेल. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.