आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Painted To Look Like Beautiful Parrot By Italian Painter

इटलीच्या बॉडी पेंटरची अजब पेंटींग, मुलीला बनवले पोपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडी पेंटींग करणा-या अनेक जणांना तुम्ही पाहिले असेल मात्र इटलीचा स्टोटर पेंटर अजब आहे. त्याने मुलीला चक्क रंगीत पोपट बनवले. या मुलीला पाहणारा प्रत्येक जण तो पोपट नसून मुलगी आहे हे माहित झाल्यावर हैराण होतो.
स्टोटरने त्या मुलीला बॉडी पेंटींग करण्यासाठी तयार केले आणि खूप परिश्रमानंतर त्याने त्या मुलीला पोपटाचा लूक दिला. इटलीचा रहिवासी असणारा 35 वर्षीय पेंटर जोहान्स स्टोटर अशा प्रकारे पेंटींग करतो की पाहणारा अवाक होऊन पाहतच राहतो. त्याचे पेंटींग पाहिल्यानंतर ते पेंटींग आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
ही कला आत्मसाद करण्यासाठी स्टोटरला चार आठवडे लागले. मुलीला हुबेहुब पोपटाचा लूक देण्यासाठी स्टोटरला केवळ चार तास लागले. हेच नाहीतर स्टोटरने आतापर्यंत असे अनेक पेंटींग तयार केले आहेत. त्याच्या बॉडी पेंटींगच्या कलेला जगभरातून दाद मिळत असते.
स्टोटरने मुलीला पोपटाचा लूक कसा दिला पाहा पुढील फोटोंमध्ये...