आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Who Gave Birth In The Bathroom Of A Busy Sports Bar Then Killed Her Baby

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26 वर्षीय महिलेची पबमध्ये प्रसूती; जन्मदात्रीनेच टॉयलेटमध्ये टाकले नवजात शिशू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील पेंसेल्वेनिया येथील एका पबमध्ये मातृत्त्वाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 26 वर्षीय महिलेने पबमधील टॉयलेटमध्येच तिचे नवजातशिशू टाकून कुस्तीच्या सामन्याचा आनंद लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आमंडा हेन असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनूसार, आमंडा हेन ही पबमध्ये कुस्तीचा सामना पाहण्यासाठी आली होती. तिला माहीत होते, की तिची कोणत्याही क्षणी प्रसूती होवू शकते. परंतु तिने याबाबत कोणालाही कल्पना दिली नव्हती. तिला प्रसूत वेदना सुरु झाल्यानंतर ती टॉयलेटमध्ये बालकाला जन्म दिला. परंतु कुस्ती पाहण्याच्या नादात तिने तिच्या नवजात शिशूला टॉयलेटमध्ये टाकून रक्ताने माखलेल्या कपड्यांनी पबमध्ये सुरु असलेला कुस्तीचा सामना पाहण्यासाठी उपस्थित झाली होती. मात्र टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी पोहोचलेल्या सफाई कर्मचार्‍यांना मृत नवजातशिशू आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. आमंडा हेनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला मृत्यूदंडाची शिक्षा होवू शकते.