आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिसमधील महिलांना ट्राऊझर घालण्यास अखेर परवानगी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- पॅरिसमध्ये महिलांना पुरुषांप्रमाणे वेशभूषा करण्यास कायद्याने मनाई होती. दोनशे वर्षांपूर्वीचा हा कायदा रद्दबातल झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आता येथील महिलांना ट्राऊझर घालण्यास कोणीही मज्जाव करू शकणार नाही.

फ्रान्समधील नवीन कायदा आणि मूल्यांच्या काळात 18 व्या शतकात तयार झालेला हा कायदा बिनकामाचा आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात येत असल्याची माहिती फ्रान्सच्या महिला हक्कविषयक मंत्री नजात वल्लाद-बेकेम यांनी सोमवारी हे जाहीर केले. 17 नोव्हेंबर 1800 मध्ये तयार झालेल्या या जाचक कायद्यात 1892 आणि 1909 मध्ये सुधारणाही करण्यात आली होती. त्या काळी महिलांना सायकल चालवताना किंवा घोडेस्वारी करताना ट्राऊझर घालण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागत. हा कायदा स्त्री-पुरुष समानतेची पायमल्ली करणारा असल्याने तो रद्द करण्यात आला आहे. फ्रान्सच्या राजकीय इतिहासात महिलांची वेशभूषा हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सेसिल डफ्लॉट या 37 वर्षीय महिला मंत्र्याने जीन्स पँट घालून संसदेत प्रवेश केला होता. त्या वेळी देशात चर्चेला उधाण आले होते. पुढारलेल्या देशात अजूनही पारंपरिक मूल्यांसाठी महिलांचे हक्क नाकारले जात असल्याबद्दल फ्रान्सवर टीका झाली आहे.