आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील या भागात महिला असणे ठरतो गुन्हा, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूलमध्‍ये बॉम्ब स्फोटात जखमी महिलेला सुरक्षित स्थळी नेताना जवान - Divya Marathi
काबूलमध्‍ये बॉम्ब स्फोटात जखमी महिलेला सुरक्षित स्थळी नेताना जवान
इंटरनॅशनल डेस्क - जगातील कोणत्याही भागात महिलांचे अधिकार आणि त्यांची सुरक्षा प्रत्येक वेळेस महत्त्वाची राहिली आहे. पण असे असतानाही जगभरात महिलांची स्थिती चांगली नाही. नायजेरियात अपहरण करण्‍यात आलेल्या शाळकरी मुली घरी परतल्या नसताना बोकोहरमने काही महिलांचे अपहरण केले आहे. इराणमध्‍ये विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेला सामूहिक बलात्कारची शिक्षा दिली जाते. सुदानमध्‍ये धर्मांतर करणा-या महिलेला देहदंडाची शिक्षा सुनावली जाते. अशा घटनांना पायबंद घालण्‍यासाठी लंडनमध्‍ये लैंगिक अत्याचारावर आंतरराष्‍ट्रीय परिषद भरवण्‍यात आली आहे. परिषदेत लैंगिक अत्याचाराच्या शिकार झालेल्या लहान मुली आणि महिलांना कशी मदत करता येईल यावर चर्चा केली जात आहे.

140 देश या परिषदेत सहभागी झाले आहेत. बलात्कार महिलेसाठी केवळ अपमान नसतो तर खुप काही असतो, असे अभिनेत्री आणि संयुक्त राष्‍ट्राची विशेष प्रतिनिधी असलेल्या एंजेलिना जोलीने सांगितले आहे. ब्रिटनमधील या परिषदेत महिलांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक पर्याय मांडले जात आहेत. पण त्याने काही बदल होईल याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तान, कॉंगो, पाकिस्तान आणि सोमालिया या सारख्‍या देशांत रोज महिलांवर अत्याचार होत आहेत. पुढील छायाचित्रांच्या माध्‍यमातून या देशातील महिलांची स्थिती दाखवण्‍याचा प्रयत्न येथे केला आहे.
पुढील स्लाइड्समध्‍ये छायाचित्रांच्या माध्‍यमातून जगभरातील महिलांची स्थिती पाहा....