आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलादिनाच्या Google Doodle मध्ये आशा भोसलेंचा सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इंटरअॅक्टिव्ह डुडलच्या माध्यमातून गुगलकडून जागतिक महिलादिन साजरा करण्यात येत आहे. आजपासून रविवारपर्यंत (9 मार्च) हे डुडल अॅक्टिव्ह राहणार असून यात पार्श्वगायिका आशा भोसले, बॉक्सिंग चॅम्प मेरी कोम, पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ती मलाल युसुफझाई सारख्या जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना स्थान देण्यात आले आहे.
जागतिक महिलादिन साजरा करण्यासाठी गुगलने आज होमपेजवर सादर केलेले डुडल हे आतापर्यंतचे आठवे डुडल ठरले आहे. 2005 मध्ये पहिल्यांदा गुगलने महिलादिनावर डुडल सादर केले होते. 2009 पासून सातत्याने महिलादिनाला डुडल सादर केले जात आहे.
यावर्षीच्या डुडलमध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स वापरण्यात आले आहेत. गुगलच्या मुळ लोगोसह अनेक रंगही देण्यात आले आहे. गुगलच्या दुसऱ्या 'ओ' या अल्फाबेटमध्ये प्ले बटण देण्यात आले आहे. त्यावर क्लिक केल्यावर युट्युबच्या एक व्हिडिओ प्ले होतो. त्यात जगभरातील वेगवेगळ्या प्रांतांमधील महिला त्यांच्या स्थानिक भाषेत महिलादिनाच्या शुभेच्छा देतात.
महिलांच्या अतुलनिय कामगिरीचीचे कौतुक करण्यासाठी 8 मार्च रोजी जागतिक महिलादिन साजरा केला जातो. 1908 पासून काही भागांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येत होता. परंतु, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत यासंदर्भात ठराव करण्यात आल्यानंतर 8 मार्च या दिवसाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली.
सर्वांगिण प्रगतीसाठी महिलांना समाज दर्जा मिळावा, हे यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिलादिनाची थिम संयुक्त राष्ट्रसंघाने निर्धारीत केली आहे.