Home | International | China | women delivery postpond china

अशुभ दिवसामुळे प्रसूती डॉक्टरने लांबवली आणि ...

वृत्तसंस्था | Update - Sep 17, 2011, 11:57 PM IST

विज्ञान युगात शुभ-अशुभाला थारा नाही; परंतु चीनमधील एका डॉक्टर महाशयांनी एका महिलेची प्रसूती चक्क अशुभ दिवसामुळे लांबवली.

  • women delivery postpond china

    बीजिंग - विज्ञान युगात शुभ-अशुभाला थारा नाही; परंतु चीनमधील एका डॉक्टर महाशयांनी एका महिलेची प्रसूती चक्क अशुभ दिवसामुळे लांबवली. परिणामी मूल बेशुद्ध अवस्थेत जन्मले. या बेजबाबदार डॉक्टरांकडून चिनी कुटुंबाने मोठ्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
    डॉक्टरांच्या वागण्यामुळेच आमचे मूल गेल्याचा आरोप ली शिऑजिन (32) या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा गुंता सोडविण्यासाठी आता आरोग्य अधिकारी प्रयत्न करीत आहेत. झेंग योना असे या डॉक्टरांचे नाव आहे. 12 ऑगस्ट रोजी ही महिला प्रसूतीसाठी गॉंगडॉंग येथील पीपल्स रुग्णालयात दाखल झाली होती.
    13 रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. चिनी कॅलेंडरनुसार हा दिवस शैतानी दिन म्हणून सांगितला जातो. या दिवशी आपण शस्त्रक्रिया करणार नसल्याचे डॉक्टर योना यांनी सांगितले. त्यानंतर ती 14 रोजी करण्यात आली. या महिलेचे सिझेरियन करण्यात येणार होते. शस्त्रक्रिया एक दिवस पुढे ढकलण्याची या कुटुंबाचीही इच्छा होती. कारण होणा-या मुलासाठी हा दिवस अशुभ ठरू नये, असे त्या कुटुंबालाही वाटत होते, असे रुग्णालयीन प्रशासनाच्या म्हणणे आहे. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर नर्सेसना मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत. त्या मुलाचा जन्म अतिशय गुंतगुंतीच्या स्थितीत झाला. हे मूल जेमतेम तीन दिवस जगले त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

Trending