आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Fined For Wearing Google Glass While Driving

कॅलिफोर्नियामध्‍ये गुगल ग्लास घालून वाहन चालविणा-यास दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया - गुगल ग्लास घालून गाडी चालवल्याबद्दल कॅलिफोर्नियातील अबादेई नामक महिलेस दंड ठोठावण्यात आला. त्यांच्यावर वाहनाचा अति वेग आणि चष्मा घालून गाडी चालवण्याचा आरोप लावण्यात आला. अबादेई यांनी याविरोधात कायद्यात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅलिफोर्नियामध्ये ड्रायव्हिंग करत असताना टीव्ही बघण्यावर नियमानुसार बंदी आहे. गाडी चालवत असताना माझा गुगल चष्मा बंद होता असे अबादेई यांनी सांगितले. हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्या सध्या गुगल प्लस नेटवर्कच्या माध्यमातून चर्चा करत घडवून आणत आहेत. सोबत त्यांनी चालानची प्रतही पोस्ट
केली आहे. हे प्रकरण म्हणजे राज्य वाहन संहिता 27602 चा उल्लंघन असल्याचे कॅलिफोर्निया राजमार्ग पोलिस विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.