आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Have 150 Different Hairstyles In Their Lifetime

महिला आयुष्यभरात दीडशे हेअरस्टाइल आजमावतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - महिला आयुष्यभरात विविध दीडशे हेअर स्टाइल आजमावून पाहतात, असे नव्या अभ्यासात आढळून आले आहे. यामध्ये केसांचा आकार, रंगछटा व कटचा समावेश आहे.
2000 महिलांच्या केशरचनेच्या आवडीनिवडी अभ्यासण्यात आल्या. त्यामध्ये हेअरड्रेसरकडे जाताना प्रत्येक वेळी नवी केशरचना असावी, अशी 20 पैकी एका महिलेची इच्छा असते. 50 टक्के महिलांना केशरचनेबाबत विविध प्रयोग करायला आवडते. महिलांना दोन नव्या हेअर स्टाइल करायला आवडतात. शिवाय वर्षांतून एकवेळ केसाचा रंग बदलण्यास त्या प्राधान्य देतात. 15 ते 65 वयादरम्यान 100 वेळा केसांचा रंग बदलला जातो. कंटाळा आला म्हणून बदल करणार्‍यामहिलांचे प्रमाण 64 टक्के आहे.
सेलिब्रिटीसारखी हेअर स्टाइल असावी म्हणून त्यात बदल करणार्‍यामहिलांचे प्रमाण 12 टक्के आहे, तर विवाहासाठी केशरचना बदलणार्‍यामुली, महिलांचे प्रमाण 15 टक्के आहे. 100 पैकी 13 महिला अपत्यप्राप्तीनंतर केशरचना बदलतात. नवा लूक दिसण्यासाठी वाढदिवस व ब्रेकअप हे महिलांसाठी निमित्त ठरते. महिला वर्षाकाठी पाचवेळा हेअरड्रेसर्सकडे जातात, असे ‘टोनी अ‍ॅँड गाय स्टाइलिस्ट’ने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.