आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: अमेरिकेत प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र मशीद, पुरुषांच्या प्रवेशावर बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : लॉस अँजलिस येथे सुरू झालेली महिलांची मशीद.
लॉस अँजलिस - लॉस अँजलिसच्या परिसरात महिलांसाठी स्वतंत्र अशी पहिलीच मशीद सुरू करण्यात आली आहे. या मशिदीमध्ये पुरुषांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच मशीद आहे.
लॉस अँजलिस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या मशिदीत उद्घाटनाला नमाजपठणासाठी पीको..युनियन प्रोजेक्ट अंतर्गत 100 महिला एकत्र जमल्या होत्या. महिलांनी इतर महिलांशी संलग्न होण्यासाठी आणि काहीतरी नवे शिकण्यासाठी एकत्रित येणे हा त्यामागचा उद्देश आहे.
पासाडेना येथील कार्डियोलॉजिस्ट यास्मीन रूहगे म्हणाल्या की, मुस्लीम महिलांची कोणतीही संघटना नाही. ने कहा, जेव्हा आम्ही इतर मशीदीत जातो, त्यावेळी आम्हाला एका बाजुला बसावे लागते. पण याठिकाणी आम्ही सर्व महिलाच असल्याने आम्हाला आपसांत बोलायला वेळ मिळतो. भारतासह चीन आणि चिली याठिकाणीही केवळ महिलांसाठी स्वतंत्र मशिदी आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, केवळ महिलांसाठीच्या मशिदीचे PHOTO...