न्यूयॉर्क - महिलांनी वेतनवाढ मागू नये, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने
मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला चांगलेच अडचणीत आले. या वक्तव्यावरून अमेरिका आणि भारतात सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी माफी मागितली.
महिलांच्या ग्रेस हॉपर कॉन्फरन्समधील मुलाखतीत वेतनवाढ मागताना काही महिला संकोचतात त्याबाबत
आपण कोणती सूचना कराल, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर नडेला म्हणाले की, ‘कर्म करा. कर्मफलावर विश्वास ठेवा. वेतनवाढ मागू नका. तुमची वाटचाल व्यवस्थित असेल तर तुम्हाला योग्य वेतनवाढ मिळेलच, असा विश्वास बाळगा.