आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदर वर्ल्ड किंगडम: येथे महिला पुरूषांना गुलाम बनवतात, प्राण्यांप्रमाणे वागवतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात एक असाही देश आहे जेथे महिला पुरूषांना गुलाम बनवतात. जेथे पुरूषांना प्राण्यांप्रमाणे वागवले जाते. या देशात महिला त्यांच्या मनाप्रमाणे पुरूषांना वागवतात. 'वुमेन ओव्हर मेन' मोटो असणा-या या देशाचे सरकारही महिलांच्या हातात आहे.
या देशाचे नाव अदर वर्ल्ड किंगडम आहे. 1996मध्ये यूरोपियन झेक रिपब्लिकपासून हा देश तयार करण्यात आला आहे. या देशाची राणी पॅट्रिसिया- 1 हीची मक्तेदारी आहे. या राज्याला इतर देशांनी देशाचा दर्जा दिला नाही. या देशाची राजधानी ब्लॅक सिटी आहे.
झेक रिपब्लिकमध्ये असलेल्या या देशाचे स्वतंत्र झेंडा, चलन, पासपोर्ट आणि पोलिस यंत्रणा आहे. या देशाच्या मुळ नागरिक केवळ महिला आहेत. येथे पुरूषांना प्राणी समजले जाते. पुरूषांना गुलाम समजले जाते. हा देश तयार करण्यासाठी दोन मिलीयन डॉलरचा खर्च लागला होता.
महाराणी पॅट्रिसिया-1 हिलाच केवळ नियमात बदल करण्याचा अधिकार आहे. या देशाच्या नागरिकत्वासाठी तिने काही नियम तयार केले आहेत.
- कोणतीही स्त्री जी स्वत:च्या सम्मतीने शरीर सबंध ठेवण्यासाठीची वयाची अट पूर्ण करते.
- तिच्याकडे किमान एक पुरूष नौकर असणे गरजेचे आहे.
- अदर वर्ल्ड किंगडमचे सर्व नियम तिने पाळले पाहिजेत.
- नागरिकत्त्व मिळावे यासाठी अर्ज केलेला असावा.
- त्या महिलेला किमान पाच दिवस महाराणीसोबत राहवे लागेल.
काय सुविधा आहेत.
तीन हेक्टर म्हणजेच 7.4 एकर जमीनीवर अनेक इमारती तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये 250 मिटरचा ओव्हल ट्रॅक छोटासा धबधबा आणि एक मैदान आहे. येथील मुख्य इमारत म्हणजे महाराणीचा महल आहे. येथूनच देशाचे पूर्ण सरकार चालवले जाते. या ठिकाणी दावत हॉल, ग्रंथालय, दरबार, यातना गृह , स्कूल रूम, जिम , आणि कैद्यांना ठेवण्यासाठी तळघरात जेल आहे. यामध्ये स्विमिंग पुल, रेस्तरॉ, आणि नाइटक्लब आहे.
पुढील स्लाइडवर पाहा या देशाचे काही फोटो...