लंडन - हिमयुगातील महाकाय लोकरी प्राण्याचा सापळा लिलावासाठी काढण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये या दुर्मिळ जीवाच्या सापळ्याचा लिलाव तब्बल १ लाख ५० हजार पाउंडांत झाला आहे. पूर्व युरोपात हा सापळा सापडला असून तो ३० ते ५० हजार वर्षांपूर्वीचा आहे. ब्रिटनच्या एका व्यक्तीने पश्चिम ससेक्समध्ये हा विक्रीसाठी ठेवला आहे.
अखंड सापळा उत्खननात सापडणे दुर्मिळ असून वेगवेगळे अवयव सापडत असल्याचे लिलाव गृहाने सांगितले. या प्राण्याचा मृत्यू १० हजार वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे.