आजच्या काळात मनुष्य जेथे रक्ताच्या नात्याला योग्य पद्धतीने निभावू शकत नाही, तेथे काही प्राणी असेही आहेत, जे मैत्रीचे आदर्श उदाहरण
आपल्यासमोर ठेवत आहेत. वरील फोटोमध्ये तुम्हाला हे स्पष्टपणे दिसून येईल. भालू, वाघ आणि सिंहाचे त्रिकुट असो किंवा चिंपांझी व कुत्र्याची जोडी यांच्याबद्दल प्राणीसंग्रहालयातील कर्मचार्यांचा असा अनुभव आहे की, हे मित्र असे आहेत जे एकमेकांपासून जास्त वेळ दूर राहू शकत नाहीत.
4 ऑक्टोबर म्हणजे आज जागतिक प्राणी दिवस आहे. या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला प्राण्यांमधील 15 अनोख्या जोड्या फोटोंच्या माध्यमातून दाखवत आहे.
तुम्हाला माहिती आहे का, जागतिक प्राणी दिवस का साजरा केला जातो? यामागचे कारण असे आहे की, जगभरात ज्या गतीने विकास होत आहे, त्यामुळे प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. लोकांच्या मनामध्ये प्राण्यांच्या संरक्षणाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी इटलीमध्ये 4 ऑक्टोबर 1931 साली जागतिक प्राणी दिवसाची सुरुवात करण्यात आली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दोन प्राण्यांमधील अनोखी दोस्ती...