आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Bank Inserted Indian Teriteory In Neigbour Country

जागतिक बँकेने भारताचा भूप्रदेश टाकला शेजारील राष्‍ट्राच्या घशात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारतीय सार्वभौमत्वाचा फारसा विचार न करता जागतिक बँकेने आपल्याकडील नकाशात भारताचा भूप्रदेश शेजारील देशांच्या घशात घालण्याचा उद्योग केला आहे. भारतीय खासदाराने चुकीच्या नकाशाबद्दल या जबाबदार संस्थेचा निषेध करून तत्काळ चूक दुरुस्तीची मागणी केली आहे.


भाजपचे राज्यसभेतील खासदार तरुण विजय यांनी हा मुद्दा उचलला असून त्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. मंत्रालयाने हा विषय वर्ल्ड बँकेच्या अधिका-यांकडे मांडावा, अशी मागणी विजय यांनी केली आहे. बँकेच्या दक्षिण आशियाई विभागाच्या प्रमुख कल्पना कोचर यांच्यासमोर हा विषय मांडण्यात आला आहे. वर्ल्ड बँकेने काही प्रदेश चीन आणि पाकिस्तानचा असल्याचे नमूद केले आहे.