आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Bank News In Marathi, Electricity Production In India, Divya Marathi

भारतीय विजेसाठी पाकला वर्ल्ड बँकेच्या मदतीचे इंधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेला वीजपुरवठा करार अखेर लवकरच प्रत्यक्षात येणार असे दिसते. कारण वर्ल्ड बँकेने वीज वाहिन्यांसाठी आर्थिक मदत देऊ केल्यामुळे पाकिस्तानने वीज आयात कराराची पूर्तता करण्यासंबंधी हालचाली वाढवल्या आहेत. त्यामुळे लवकरच पाकिस्तानमध्ये भारताची वीज पुरवली जाऊ शकते.
वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला देऊ केलेल्या आर्थिक मदतीचा वापर वीजपुरवठा वाहिन्या सुरू करण्यासाठी केला जाईल. भारतातून 1200 मेगावॅट वीज आयात करण्याचा प्रस्ताव पाकिस्तान सरकारच्या विचाराधीन आहे. त्याला भारताची देखील अनुकूलता आहे. त्यामुळे भारतासोबत करार करण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे पाकिस्तानच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. करारासंबंधीचा मसुदा अलीकडेच झालेल्या राजधानीतील बैठकीत भारतीय अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यात किमान सामायिक मसुद्याचा समावेश आहे. मसुद्याचे अवलोकनानंतर भारताकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल.


कॅबिनेटची मंजुरी
पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने जानेवारी महिन्यातच भारताकडून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. उभय देशांत समझोता करारासंबंधी कॅबिनेटने मंजुरी दिली होती. त्या अगोदर भारतीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा आणि पंजाब प्रांताचे शहाबाझ शरीफ यांच्या चर्चेत प्रस्तावाला गती मिळाली होती.