Home »International »Other Country» World Best Festival And Public Participation

PHOTOS : आस्था आणि झगमगाटाचा संगम

शादाब समी, डीबी स्टार | Feb 20, 2013, 09:14 AM IST

जगभरात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात आणि त्यामध्ये एकाच वेळी लाखो लोक एकत्र येतात. लोकांची उपस्थितीच या उत्सवांना आकर्षणाचा केंद्र बनवते. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. एकाच वेळी, एकाच दिवशी आणि एकाच उद्देशाने लोक एकत्र येणारे काही प्रमुख फेस्टिव्हल्स पुढीलप्रमाणे..

कुंभमेळा हिंदूंच्या आस्थेचा सर्वात मोठा उत्सव आहे. एका धार्मिक उद्देशाने सर्वाधिक लोक सहभागी होण्याचा विश्वविक्रमही कुंभमेळ्याच्याच नावे आहे. एकाच आयोजनात एवढे लोक एकत्र कसे काय येतात? त्यांची व्यवस्था कशी केली जाते? यावर हॉर्वर्ड विद्यापीठ संशोधन करणार आहे. महाकुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक मुद्दय़ांवर या विद्यापीठाचा एक गट लवकरच अलाहाबाद येथे सुरू असलेल्या मेळ्यात सहभागी होऊन संशोधन कार्य पूर्ण करणार आहे. यंदा कुंभमेळा 55 दिवस चालणार असून त्यामध्ये सुमारे 10 कोटी लोक सहभागी होण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्याप्रमाणे जगात इतरही अनेक महोत्सवांचे आयोजन केले जाते. हे महोत्सव धार्मिक किंवा पारंपरिक उद्देशाने साजरे केले जातात आणि त्यामध्ये लाखो लोक एकत्र येतात.

गर्दीचे उच्चांक
कुंभमेळा
अलाहाबादेत 2001 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या दिवशी 4 कोटी लोकांनी सहभाग घेतला होता. तसेच यंदाच्या अलाहाबाद कुंभ मेळ्यात 10 कोटी सहभागी होण्याची शक्यता आहे.
अर्बाइन
1.9 कोटी लोक करबला (इराक) शहरात इमाम हुसेन यांच्या कबरीवर झालेल्या अर्बाइन दरम्यान एकत्र आले होते. यापूर्वी 2012 मध्ये अर्बाइनच्या वेळी 1.8 कोटी लोक जमा झाले होते.
ब्लॅक नाजारेने
जानेवारी 2012 मध्ये ब्लॅक नाजारेनेच्या मिरवणुकीत 80 लाख लोक सहभागी झाले होते. ब्लॅक नाजारेने हा येशू ख्रिस्तांचा डार्क वुडन पुतळा आहे. फिलिपाइन्समध्ये ही मिरवणूक काढली जाते.
एल शाद्दाई मूव्हमेंट
फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये आयोजित एका कार्यक्रमात 70 लाख लोक सहभागी झाले होते. एल शाद्दाई मूव्हमेंट ही फिलिपाइन्स कॅथोलिन कॅरिस्मॅटिक रिनुअल मूव्हमेंट आहे.

रिओ कार्निव्हल : सर्वात मोठी पब्लिक पार्टी

रिओ कार्निव्हलला जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध पब्लिक पार्टी म्हटले जाते. दरवर्षी लेंट (ख्रिश्चनांची एक धार्मिक परंपरा) पूर्वी होणार्‍या या महोत्सवादरम्यान दररोज जवळपास 20 लाख लोक रस्त्यावर येऊन जल्लोष साजरा करतात. हा कार्निव्हल ब्राझीलच्या अनेक मोठय़ा शहरांमध्ये देखील होतो; परंतु ब्राझीलच्या रिओ दी जानेरियो या दुसर्‍या सर्वात मोठय़ा शहरात या कार्निव्हलचा रंग अत्यंत वेगळा असतो. यावर्षी 8 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत हा कार्निव्हल आयोजित केला गेला होता. कार्निव्हलची तयारी अनेक महिन्यांपूर्वीच सुरू केली जाते. कार्निव्हल दरम्यान संगीत, नृत्य, फ्लोट्स आणि परेडच्या नशेत संपूर्ण शहर बुडालेले असते. रिओ कार्निव्हलचे आयोजन पहिल्यांदा 1723 मध्ये करण्यात आले होते.

Next Article

Recommended