अॅटलांटा - अॅटलांटा हे अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांताचे प्रसिध्द शहर आहे. येथे जगातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे. या यार्डात 3 हजार 648 लोकोमोटिव्ह (इंजिन) आणि 79 हजार 82 फ्रेट कार (मालगाडीचे डब्बे) ऑपरेट करण्याची क्षमता आहे. रेल्वे यार्ड ही नोरफॉल्क दक्षिण रेल्वे या विभागाच्या अंतर्गत येते. ती अमेरिकेच्या 22 राज्यांमध्ये 34 हजार 279 हजार किमी रेल्वे नेटवर्कचे संचालन करते. 70 पेक्षा जास्त ट्रॅक हे समांतर पध्दतीने चालवले जातात. येथील छायाचित्रांत तुम्हाला अनेक ट्रॅक दिसत असतील. पण रेल्वेच्या नियमित आमगन आणि निर्गमनासाठी मात्र दोनच ट्रॅक आहेत.
नोरफॉल्क दक्षिण रेल्वे विभाग अमेरिकेत गेल्या दोन शतकांपासून कार्यरत आहे. अमेरिकेच्या परिवहन जाळ्याचे तो अविभाज्य अंग बनला आहे. औद्योगिकीकरणातून पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी नोरफॉल्कने खासगी संस्थांची मदत घेतली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा या ट्रॅकची काही छायाचित्रे....
सोर्स- tumblr.com