आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छायाचित्रांमध्‍ये पाहा, 'वर्ल्ड बॉडी पेंटिंग फेस्टिव्‍हल'ची झलक! 46 देशांच्‍या कलावंतांचा सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरसेक - ऑस्‍ट्रेलियामधील सुंदर झ-यांचे शहर म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पोरसेकमध्‍ये 'वर्ल्ड बॉडी पेंटिंग फेस्टिव्‍हल' सुरु आहे. 29 जून पासून सुरु झालेला हा फेस्टिव्‍हल 6 जुलै पर्यंत असणार आहे. 17 वर्षांपासून दरवर्षी या फेस्टिव्‍हलचे आयोजन केले जाते. यावर्षी फेस्टिव्‍हलमध्‍ये 46 देशांच्‍या कलावंतांनी सहभाग घेतला आहे.
या फेस्टिव्‍हलमध्‍ये जगभरातील कलाकार आपली कला आणि संस्‍कृतीतीत वेगवेगळे आयाम सादर करत असतात. यामध्‍ये आर्टिस्‍ट मनुष्‍याच्‍या शरीराचा कॅनव्‍हाससारखा वापर केला जातो. रंगांच्‍या माध्‍यमातून मॉडल डोक्‍यापासून ते पायापर्यंत संपूर्ण सजवली जाते. काही मॉडेल्‍स् सौंदर्यामध्‍ये भर पडण्‍यासाठी मुकुट तसेच साजशृंगार करुन येतात.
कला चांगल्‍या पध्‍दतीने समजण्‍यासाठी फेस्टिवलमध्‍ये बॉडी पें‍टींगचा वर्कशॉप आणि व्‍याख्‍यानाचेसुध्‍दा आयोजन केले आहे. फेस्टिवलमध्‍ये संगीत, फॅशन शो, कॉन्‍टेस्‍ट आणि प्रदर्शनाचा समावेश आहे. याववर्षीच्‍या चॅम्पियन्‍स ठरलेल्‍या कलाकाराला मेकअप कंपनी क्रॅयोलानकडून पुरस्‍कार मिळणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, 'वर्ल्ड बॉडी पेंटिंग फेस्टिव्‍हल'मधील कलाकृती..