ओस्लो - उत्कृष्ट अशा रस्त्यांवरून प्रवास करण्याचा एक स्वर्गीय आनंद असतो. तशी जगात काही रस्तेही आहेत. पण वास्तवात ती खूप धोकादायक अशा श्रेणीत मोडतात. त्यापैकीच युरोपचा ट्रोलस्टिगेन, ट्रोल्स पाथ, फ्रान्सचा कोल दे टूरिनी रोड आणि पाकिस्तानमधील काराकोरम महामार्ग आहेत. अशा प्रकारचा रस्ता नॉर्वेमध्ये एक रस्ता आहे. तो नॅशनल टूरिस्ट रूट्स या नावाने ओळखला जातो. त्याचे मूळ नाव अॅटलांटिक रोड असे आहे. तो आपल्या सुंदरतेमुळे पर्यटकांना आकर्षित करतो, तर दुसरीकडे तो सर्वात धोकादायक रस्ता म्हणून ओळखला जातो.
1986मध्ये नॉर्वेतील अॅटलांटिक रोड 64 कंट्री रोडच्या रूपात निर्मिती करण्यात आली होती. तो धोकादायक असल्यामुळे त्याचे दुहेरीकरण करण्यात आले नाही. अॅटलांटिक रोड नॉर्वेमधील समुद्रात असलेल्या विविध बेटांना जोडते. या रस्त्याची लांबी साडे आठ किलोमीटर इतकी आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा अॅटलांटिक रोडची काही उत्कृष्ट छायाचित्रे....