आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पृथ्‍वीवरील सर्वात खोल आहे ही गुफा, पाहा अंगावर काटा आणणारी गुफेची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( जॉर्जियातील वोरोन्य गुफा ) - Divya Marathi
( जॉर्जियातील वोरोन्य गुफा )
अखाजिया - तुम्हाला छायाचित्रात दिसत असलेली ही जगातील सर्वात खोल वोरोन्या गुफा आहे. त्यावर जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. गुफेला क्रूबर गुफा या नावानेही ओळखले जाते. ही गुफा जॉर्जियाच्या अखाजियात असलेल्या घाघरा पर्वतांच्या मधोमध स्थित आहे. तिच्या दोन शाखा आहेत. एक 1300 मीटर खोल आहे, तर दुसरी मुख्‍य शाखा जमीनच्या आत 2 हजार 196 मीटर खोल आहे. तिच्या अनेक उपशाखाही आहेत.

पहिल्यांदा संशोधक गुफेत केव्हा पोहोचले?
अखाजिया गुफेत सर्वप्रथम जॉर्जियाचे संशोधक 1960 मध्‍ये पोहोचले होते. ते गुफेच्या आत 95 मीटरपर्यंत खोल गेले होते. यानंतर दुसरा गट 1968 मध्‍ये पोहोचला. वेळोवेळी येथे अभ्‍यासासाठी संशोधक येत राहिले आणि प्रत्येक वेळी खोलीच्याबाबत नव-नवीन माहिती सामोर आली.

वेगवेगळी माहिती समोर आली
2001 मध्‍ये रशिया आणि युक्रेनचा चमूने गुफेची खोली 1710 मीटर असल्याचे सांगितले. त्यानंतर 2004 मध्‍ये तीन संशोधकांना गुफा यापेक्षा खोल असल्याचे आढळले. 2007 मध्‍ये करण्‍यात आलेल्या अभ्‍यासाच्या निष्‍कर्षात आश्‍चर्यकारक परिणाम समोर आला. संशोधकांच्या चमूंनी शोधानंतर गुफेची खोली 2191 ते 2197 मीटरच्या जवळपास आहे, असे स्पष्‍ट केले. त्याबरोबरच 2197 मीटर या गुफेची लांबी असल्याचे पुढे आले. आत 200 मीटर गेल्यास तिच्या दोन उपशाखा फुटतात, असेही दिसून आले.

गुफेत पोहोचली पहिली महिला संशोधक
वोरोन्य गुफेमध्‍ये 2197 मीटर खोल पोहोचणारी पहिली महिला ठरली सॉल पानकेने. त्या लिथुआनियाच्या होत्या. तीन अन्य सदस्यांबरोबर सॉल सप्टेंबर 2010 मध्‍ये गुफेत गेल्या होत्या.

पुढील स्लाइड्समध्‍ये पाहा जगातील सर्वात खोल असलेल्या वोरोनिया गुफेची छायाचित्रे.....