आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Experiences Hottest November In 134 Years |

नोव्हेंबर महिना 134 वर्षांतील सर्वात उष्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - यंदाच्या नोव्हेंबरमध्ये जगभरात प्रचंड उष्णता जाणवली होती. उष्णतेचे प्रमाण 134 वर्षांत पहिल्यांदाच इतके मोठ्या प्रमाणात होते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
अमेरिकेच्या सागरी आणि हवामान प्रशासनाच्या (एनओएए) अहवालात नोव्हेंबर महिना सर्वात उष्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याअगोदर 1880 मध्ये पृथ्वीचे तापमान प्रचंड वाढले होते. आफ्रिका, युरोशिया, दक्षिण अमेरिकेच्या अनेक देशांत तापमान वाढल्याचे जाणवले. नैर्ऋत्य प्रशांत महासागर, भारतीय उपसागरामध्ये तापमान वाढ अनुभवायला मिळाली. अमेरिका, उत्तर अमेरिका, ग्रीनलंड, ऑस्ट्रेलियाच्या काही प्रदेशात तापमानात घट आल्याचे ‘नेचर वर्ल्ड न्यूज’ च्या वृत्तात म्हटले आहे.