आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Famous Glass Beach In California, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Real Beauty: हा आहे भुरळ घालणारा ग्लास बीच, चोहिकडे फक्त काचेचे साम्राज्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ग्लास बीच) - Divya Marathi
(ग्लास बीच)
कॅलिफोर्निया - जगात अनेक विलोभनीय बीचेस(समुद्र किनारे) आहेत. जी नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. कॅलिफोर्नियाच्या फोर्टब्रॅगमध्‍ये एक असेच बीच आहे, जो ग्लास बीच या नावाने ओळखला जातो. निसर्ग आपल्या अंतर्गत हालचालींनी चमत्कारी अशी भूरूपे निर्माण करतो. परंतु ग्लास बीच हे मानवनिर्मित आहे.

मॅककॅर‍िशर नावाने लोकप्रिय असलेल्या या बीचची कथा खूपच वेगळी आहे. 20 शतकात फोर्ट ब्रॅगच्या रह‍िवाशांनी घरगुती कचरा पर्वताच्या खाली टाकायचे. यात इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स, जुन्या गाड्यांचे पार्टस् आणि काचेची तुकडे असायची. कॅलिफोर्निया स्टेट वॉटर बोर्डने येथे कचरा टाकण्‍यास लोकांना मज्जाव केला आणि त्याची स्वच्छतेस सुरूवात केली. पाण्‍यातील कचरा काढला गेला. पण काचाची तुकडे तशीच राहिली. नंतर एका प्रायव्हेट कंपनीने ग्लास बीचचा समावेश मॅककॅरिशर स्टेट पार्कमध्‍ये केला. या ब‍ीचवर कोटीच्या संख्‍येने रंग-बेरंगी वेगवेगळ्या आकारात काचेची तुकडे पसरलेली आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा सुंदर अशा बीचची छायाचित्रे....