आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Largest Artificial Beach Seagaia Ocean Dam Japan, Divya Marathi

BEAUTY: जगातील सर्वात मोठा आर्टिफ‍िशियल बीच, लुटा निसर्गाचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृत्रिम(आर्टिफिशियल) बीच हॉंगकॉंग, बर्लिन आणि टोरँटोसह संपूर्ण जगभर लोकप्रिय झाले आहेत. जपानमधील म‍ियाझाकी येथे जगातील सर्वात मोठा कृत्रिम बीच आहे. त्याचे सीगैया ओशियन डॅम असे नाव आहे. 984 फुट लांब आणि 328 फुट रूंद अशा बीचवर जगातील सर्वात मोठे छत आहे. जे हटवले जाऊ शकते. खजूराची सुंदर झाडे, पांढरी वाळू आणि पाण्‍याच्या उंच लाटा पर्यटकांना आकर्षित करतात. जपानच्या या ओशियन डॅम बीचवर दहा हजार पर्यटक येऊ शकतात. 1993 मध्‍ये सुरू झालेल्या या बीचला वर्षात 12 लाख लोक भेट देतात. समुद्रकिनारा येथून केवळ तीन किलोमीटर दूर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा या बीचची छायाचित्रे....
सोर्स- viralnova.com