आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Largest Building Opened In China Having Shopping Stores Hotels Water Park And A Village Also

PHOTOS : जगातील सर्वात मोठ्या इमारतीत आहे कृत्रिम सूर्य, पाहा, काचेचा महाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेंगदू - अमेरिकेच्या वणव्याने अँरिझोनाची होरपळ होत असताना चीनमध्ये जगातील सर्वात मोठी इमारत उभी राहिली आहे. ही इमारत एवढी मोठी आहे की, त्यात सिडनी येथील 20 ऑपेरा हाऊस किंवा पँटागॉन सारख्या तीन इमारती सहजरित्या सामाऊ शकतील. ही इमारत तयार होण्यासाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. गेल्या आठवड्यात तिचे लोकार्पण करण्यात आले आहे.

सिच्यूआन प्रांतातील चेगुंद येथे न्यू सेंच्युरी ग्लोबल सेंटर नावाने ही इमारत डौलात उभी राहिली आहे. 1.9 वर्ग मीटर फूट जागेत ही इमारत पसरलेली असून, यात शॉपिंग सेंटर, वॉटर पार्क, आईस स्केटींग, अनेक हॉटेल्स आणि एक गाव देखील वसलेले आहे. या इमारतीचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे येथे राहाणा-या लोकांना हवामानाची चिंता करण्याची गरज नाही. मोठ-मोठ्या काचांनी तयार करण्यात आलेल्या या इमारतीमध्ये स्वतःचा कृत्रिम सूर्य आहे. तो या इमारतीतील लोकांना प्रकाश देण्याबरोबरच योग्य तपमान राखणार आहे.

या ग्लोबल सेंटरची लांबी 500 मीटर आणि रुंदी 400 मीटर तर, 100 मीटर उंची आहे. चीनी अधिका-यांच्या मतानुसार न्यू सेंच्युरी ग्लोबल सेंटर जगातील सर्वात मोठी इमारत आहे.

परदेशी पर्यटकांना माहिती देणारा चीनी गाइड लियू शून सांगत होता की, काचेपासून तयार केला गेलेला कृत्रिम सूर्य येथील दुकानांना 24 तास प्रकाश आणि ऊर्जा देईल.

या इमारतीचे डिझाइन ब्रिटीश-इराकी वंशाचे आर्किटेक्ट जाहा हदीद यांनी तयार केले आहे. चेंगदू हे चिनमधील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर आहे.