आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयाने जिंकली ब्रिटनची सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समालखा- हरियाणाच्या अमन कपूर या छायाचित्रकाराने इंग्लंडमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठ्या वार्षिक छायाचित्र स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावला आहे. वर्ल्ड फोटोग्राफी ऑर्गनायझेशन व इंग्लंडमधील मेट्रो न्यूज या वृत्तपत्रातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड ब्रुक्स विद्यापीठात आर्किटेक्चर करत असलेल्या अमन कपूरने लंडनच्या किंग्ज क्रॉस स्टेशनचे छायाचित्र काढले होते. हे छायाचित्र सर्वांच्याच पसंतीला उतरले. अमनचे वडील पी. पी. कपूर यांनी सांगितले की, या स्पर्धेची संकल्पना ‘माय यूके टुडे’ अशी होती.

‘प्रामाणिकपणे सांगतो, मी व्यावसायिक नव्हे, तर हौशी छायाचित्रकार आहे. या क्षेत्रात अननुभवी आहे. फक्त छायाचित्रे काढण्याची आवड आहे. मी मित्रांसोबत फिरायला गेलो असताना किंग्ज क्रॉस स्टेशनचे छायाचित्र काढले होते. स्पर्धेत त्याला ब्लॅक अँड व्हाइट रूपात सादर केले होते.’

अमन कपूर, छायाचित्र स्पर्धा विजेता
हॅरी पॉटरचे स्टेशन
हॅरी पॉटर सिक्वल चित्रपटात ज्या प्लॅटफॉर्मवरून पॉटर व त्याचे मित्र ट्रेन पकडतात, तेच हे स्टेशन आहे. या मालिकेतील शेवटच्या चित्रपटाचे शूटिंगदेखील इथेच झाले होते. लंडनचे किंग्ज क्रॉस स्टेशन 1852 मध्ये सुरू झाले होते.

>लंडनच्या किंग्ज क्रॉस स्टेशनचे छायाचित्र. याच छायाचित्राला पुरस्कार मिळाला आहे.
>01 मे ते 18 मेपर्यंत सॉमरसेट हाऊस लंडन येथे हे प्रदर्शन भरवले जाईल.
>07 महिन्यांपूर्वी सुरू केली फोटोग्राफी
> 2000 पैकी 33 स्पर्धक अंतिम फेरीत दाखल.