आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Press Freedom Day And Investigative Reporting

वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे.. वाचा, जगभरातील महान पत्रकार आणि त्यांची कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगभरात शानिवारी (३ मे) वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे साजरा करण्यात आला. पत्रकारांना असणारे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे हेच हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य उद्दीष्ट म्हणता येईल. पत्रकारिता हा कोणत्याही लोकशाही देशामध्ये चौथा स्तंभ मानला जातो. मात्र, तसे असले तरी पत्रकारांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जातेत, असे नाही. अनेक देशांमध्ये अजूनही माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असण्याच्या गप्पा करणार्या भारत आणि अमेरिका या देशांमध्येही अनेकदा माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जगभरात आमुलाग्र बदल घडवण्याचा मान पत्रकारिता क्षेत्राला अनेकदा मिळाला आहे. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक मोठ्या पत्रकारांनी मोठ-मोठ्या शक्तींना चाप लावण्यात यश मिळवले आहे. पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार सेमॉर हॅरेस एकदा म्हणाले होते की, 'काही तरी बदल घडणार हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत, मात्र खरे सांगायचे तर काहीही बदलणार नाही. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेते. हा बदल केवळ तुम्ही घडवू शकता.'
वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेच्या निमित्ताने जाणून घेऊ पत्रकारितेतील काही दिग्गजांबद्दल...