आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात महाग बाटली; जाणून घ्या महाग असण्याची कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिशान एव्हियन वॉटर आणि ब्लिंग एच 20 च्या मौल्यवान बाटलीची किंमत जवळपास 37 लाख रुपये इतकी आहे. परंतु या बाटलीने सगळ्यांना मागे टाकले आहे. 5.43 कोटी रुपयांची ही ओरम 79 जगातील सर्वात महागडी बाटली आहे. या बाटलीला मध्यपूर्वेतील आलिशान प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.

बाटली महाग असण्याची कारणे
>ही फाईनेस्ट क्रिस्टल आणि 24 कॅरेट सोन्यापासून बनलेली आहे.
>113 सुंदर आणि बहुमूल्य हिरे जडवण्यात आले आहेत.
>या बाटलीत जर्मनीचे सेंट लिओनहार्डमधील सगळ्यात शुद्ध झर्‍याचे पाणी आहे. या 500 मि.लि. च्या पाण्यात सोन्याचे फ्लॅक्स असतील. त्याला खाता येते.
>विशेष अँटिक लूक डिझाइन. या लिमिटेड एडिशन बाटलीत फक्त तीन तुकडे आहेत. यात महत्त्वाची बाब अशी की, या बाटलीच्या विक्रीतून येणार्‍या पैशातील दहा टक्के देणगी पाण्यासाठी देण्यात येणार आहे. ही एनजीओ संस्था विकसनशील देशात गरजवंतांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे कार्य करते.