आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीची आफत! भारतालाही तडाखा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - जगावर पुन्हा मंदीचे सावट गडद होऊ लागले आहे. बुधवारी जागतिक बँकेने मंदीच्या फे-याचा इशारा देत भारतासह सर्वच विकसनशील देशांना कंबर कसण्याची सूचना केली आहे. बँकेने 2012साठी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदराचे अनुमान अचानक घटवून 2.5 टक्के केले आहे. आधी याबाबत जागतिक बँकेने 3.6 टक्के वृद्धीदराचा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यात सुधारणा करण्यात आली आहे.
युरोपातील मंदी आणि भारत, ब्राझिलसारख्या देशांच्या अर्थव्यवस्था सुस्त झाल्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. युरोपीय देशांना जर बाजारपेठांतून निधी उभारता आला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.
जागतिक बँकेने जारी केलेल्या आपल्या ‘जागतिक आर्थिक शक्यता 2012’ या अहवालात वृद्धीदरांतील घसरणीमुळे उद्भवणा-या जोखीमांबाबत विकसनशील देशांनी तयार राहावे, असा इशारा दिला आहे. युरोपीय संकट अअर्थव्यवस्था मंदावल्यामुळे जागतिक वृद्धीदर घटण्याची आफत ओढावण्याचा धोका निर्माण झाल्याचे कारण बँकेने पुढे केले आहे.